महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राम मंदिराच्या भूमीपूजनाचं पंतप्रधानांना निमंत्रण ; 5 घुमटांसह 161 फूट उंच असणार मंदिर

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या बैठकीत राम मंदिरात 5 घुमट आणि मंदिराची उंची 161 फुटांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

By

Published : Jul 19, 2020, 11:09 AM IST

राम मंदिर
राम मंदिर

नवी दिल्ली - श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची अयोध्येत बांधण्यात येणाऱ्या भव्य राम मंदिराच्या बांधकामासंदर्भात एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राम मंदिरात 5 घुमट आणि मंदिराची उंची 161 फुटांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाळ हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. सुमारे २ तास चाललेल्या या बैठकीत विश्वस्त संस्थेचे सर्व सदस्य उपस्थित होते आणि मंदिराच्या बांधकामासंदर्भात सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली.

अयोध्येतील राम मंदिरांची 161 फूट उंची असेल आणि आता तीनऐवजी पाच घुमट बांधले जातील. राम मंदिर बांधकामाच्या भूमीपूजनसाठी ट्रस्टकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. पंतप्रधान कार्यालयाला 3 ऑगस्ट आणि 5 ऑगस्ट अशा दोन तारखा सूचवण्यात आल्या आहेत. आता याबाबत अंतिम निर्णय पंतप्रधान कार्यालयाकडून घेण्यात येईल, असं चंपत राय यांनी सांगितलं आहे, असे राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य कामेश्वर चौपाल यांनी सांगितले.

बैठकीत राम मंदिराच्या एकूण डिझाइनवर चर्चा झाली. विश्व हिंदू परिषदेने प्रस्तावित केलेल्या डिझाइनच्या आधारे राम मंदिर तयार केले जाईल. परंतु मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी सुमारे साडेतीन वर्षे लागतील. कोरोना विषाणूमुळे बांधकामांचे काम लांबणीवर पडले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details