नवी दिल्ली -जम्मू-काश्मीरमधील लोकांसाठी ही दिवाळी विशेष ठरणार आहे. संपूर्णपणे भारताशी एकरूप झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील लोकांची पहिली दिवाळी आहे. आपल्याकडे दुहेरी नागरिकत्व नसून आपण सर्व भारताचे नागरिक आहोत. ही दिवाळी आपण अभिमानाने साजरी करू, असे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव एका कार्यक्रमाला संबोधित करताना म्हणाले.
कलम ३७० : 'जम्मू-काश्मीरमधील नागरिकांसाठी ही दिवाळी खास' - Ram Madhav
जम्मू-काश्मीरमधील लोकांसाठी ही दिवाळी विशेष ठरणार आहे. संपूर्णपणे भारताशी एकरूप झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील लोकांची ही दिवाळी आहे.
जम्मू काश्मीरमधील लोकांवर कलम 370 लादून काँग्रेसने ऐतिहासिक चूक केली होती. मात्र मोदी सरकारने लोकशाही मार्गाने कलम 370 रद्द करून ही चूक सुधारली आहे. जम्मू-काश्मीरला भारतामध्ये सामावून घेण्यासाठी महाराजा हरिसिंह यांनी विलीनीकरण करारावर स्वाक्षरी केली होती. तेव्हा कलम 370 चा काहीच संबंध नव्हता. शेख मोहम्मद अब्दुल्ला आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कलम 370 ला जन्म दिला, असे राम माधव म्हणाले.
मोदी सरकारने राजकीय फायद्यामुळे किंवा त्यांच्या विचारसरणीमुळे कलम 370 रद्द नाही केले. तर जम्मू-काश्मीरमधील जनतेचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेतलेला आहे. आता जम्मू-काश्मीरमध्ये विकासाचा नवा अध्याय सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.