महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

‘जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिक नेत्यांकडून स्वार्थापोटी दहशत पसरवली जातेय’ - bjp

'अमरनाथ यात्रेदरम्यान या ठिकाणी अतिरिक्त सैन्य तैनात केले जाते. तसेच, येथे विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. मात्र, जास्तीचे सैन्य तैनात करण्याच्या कार्यवाहीकडे वेगळ्या अर्थाने पाहण्यामागे येथील स्थानिक नेत्यांचा स्वार्थ दडलेला आहे,' असे राम माधव म्हणाले.

राम माधव

By

Published : Jul 31, 2019, 9:07 PM IST

नवी दिल्ली - भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी बुधवारी श्रीनगर येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीरमधील स्थानिक राजकीय नेते त्यांच्या स्वार्थासाठी या ठिकाणी दहशतीचे वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप केला. 'केंद्र सरकारकडून उचलली जाणारी पावले येथील परिस्थितीनुसार आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये आणि विशेषतः काश्मीरमध्ये सैन्य तैनात करणे अथवा कमी करणे ही नेहमीची प्रक्रिया आहे,' असे ते म्हणाले.

'अमरनाथ यात्रेदरम्यान या ठिकाणी अतिरिक्त सैन्य तैनात केले जाते. तसेच, येथे विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. मात्र, जास्तीचे सैन्य तैनात करण्याच्या कार्यवाहीकडे वेगळ्या अर्थाने पाहण्यामागे येथील स्थानिक नेत्यांचा स्वार्थ दडलेला आहे. त्यांच्या विरोधात सध्या भ्रष्टाचारविरोधी कारवाई करणे सुरू आहे. यातून स्वतःचा बचाव करणे आणि लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवणे, जनाधार वाचवणे, सहानुभूती मिळवणे या उद्देशाने हे नेते नाटक करत आहेत,' असे माधव यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details