श्रीनगर: भारत-पाकिस्तानदरम्यान असलेल्या नियंत्रण रेषेजवळ पुन्हा पुलावामासारखे हल्ले झाले तर हल्लेखोरांना त्याचे परिणाम सहन करावे लागतील, अशी प्रतिक्रिया वायुसेना प्रमुख राकेश कुमार भदौरिया यांनी दिली. बालाकोट हवाई हल्ल्याला बुधवारी(26 फेब्रुवारी) एक वर्ष पूर्ण झाले. त्या पूर्वसंध्येला श्रीनगरमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
गुप्तहेर खात्यांच्या मदतीने वायुसेनेने नियंत्रण रेषेजवळ होणाऱ्या कारवाया रोखण्यासाठी रणनीती तयार केली आहे. बालाकोटच्या वेळीही गुप्तहेर खात्याच्या मदतीनेच योजना यशस्वी झाली होती. पुन्हा पुलवामासारखा हल्ला करण्याचा प्रयत्न जरी झाला तर त्याला सडेतोड उत्तर देण्यास वायुसेना सज्ज आहे, असे भदौरिया म्हणाले.