महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राज्यसभा खासदार अमरसिंह यांचे दीर्घ आजाराने निधन - खासदार अमरसिंह निधन

राज्यसभा खासदार अमरसिंह यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर सिंगापूर येथील माऊंट एलिझाबेथ रुग्णालयात उपचार सुरू होते.

Amar Singh
अमरसिंह

By

Published : Aug 1, 2020, 5:06 PM IST

Updated : Aug 1, 2020, 5:50 PM IST

नवी दिल्ली -नवी दिल्ली - राज्यसभा खासदार आणि समाजवादी पक्षाचे माजी नेते अमरसिंग यांचे दिर्घकालीन आजाराने निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर सिंगापूर येथील माऊंट एलिझाबेथ रुग्णालयात उपचार सुरू होते.

२०१३ मध्ये त्यांचे मूत्रपिंड निकामी झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांच्या पश्चात पत्नी पंकजा आणि जुळ्या मुली, असा परिवार आहे.

त्यांच्या निधनानंतर संरक्षक मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुब्रमण्यम स्वामी आणि इतर नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. अमरसिंह जरी जास्त काळ समाजवादी पक्षासोबत असले तरी त्यांची सर्व पक्षीय नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबध होते, असे राज्यसभा खासदार आणि भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितले.

Last Updated : Aug 1, 2020, 5:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details