नवी दिल्ली - दिल्ली हिंसाचारावरून राज्यसभेमध्ये गदारोळ झाल्याने 11 मार्चपर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे. सभागृहात दिल्ली हिंसाचावर चर्चा होत नाही. तोपर्यंत सभागृहामध्ये कामकाज होऊ देणार नाही, अशी भूमिका विरोधकांनी घेतली होती.
अर्थसंकल्पीय अधिवेशन : दिल्ली हिंसाचारावरून सभागृहात गदारोळ, 11 मार्चपर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब - सभागृहात गदारोळ
दिल्ली हिंसाचारावरून राज्यसभेमध्ये गदारोळ झाल्याने 11 मार्चपर्यंत राज्यसभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशन
लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रामध्ये राज्यसभेचे कामकाज सुरू झाल्यावर दिल्ली हिंसाचाराच्या चर्चेची मागणी करीत विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज 11 मार्चपर्यंत तहकूब केले.
दिल्ली हिंसाप्रकरणी संसदेबाहेर काँग्रेस खासदारांनी निदर्शने केले. यावेळी राहुल गांधीही उपस्थित होते. संसदेच्या अधिवेशनाचे हे दुसरं सत्र 2 मार्चपासून 3 एप्रिलपर्यंत चालणार आहे.
Last Updated : Mar 6, 2020, 12:29 PM IST