मास्को - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज(शुक्रवार) शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) बैठकीला हजेरी लावली. सिंह एससीओ संघटनेच्या बैठकीसाठी रशियाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी रशियन लष्करासाठी नव्याने बांधण्यास आलेल्या कॅथेड्रल चर्चला आणि म्युझियमला भेट दिली. सिंह यांच्यासोबत भारतीय प्रतिनिधी मंडळ असून चीन वादाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्र्यांनी बैठकीत सहभाग घेतला आहे. आज सायंकाळी सिंह चीनच्या संरक्षण मंत्र्यांना भेटण्याची शक्यता आहे.
एससीओ बैठकीला हजेरी लावण्यासाठी राजनाथ सिंह रशियाला गेले आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा तिसरा दिवस आहे. संरक्षण मंत्र्यांच्या प्रवक्त्याने ट्विटद्वारे राजनाथ सिंह यांच्या दौऱ्याची माहिती दिली. रशियन अधिकाऱ्यांसोबतचे फोटो संरक्षण मंत्रालयाने शेअर केले आहेत.