नवी दिल्ली - दुसऱ्या महायुद्धात रशियाचा विजय झाल्याच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित 75 व्या विजय दिवस कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सहभागी होणार आहेत. सोमवारी सिंह कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मॉस्कोला रवाना होणार आहेत. यावर्षी 24 जूनला रशियात विजय दिवस साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी लष्करी संचलनाचे आयोजन करण्यात येते.
दुसऱ्या महायुद्धाचा विजय दिवस साजरा करण्यासाठी राजनाथ सिंह रशियाला जाणार - विजय दिवस परेड रशिया
विजय दिवस कार्यक्रमाच्या संचलनात सहभागी होण्यासाठी शुक्रवारी भारताच्या तिन्ही दलाचे पथक मॉस्कोला गेले आहे. 24 जूनला रेड स्केअर येथे होणाऱ्या या कार्यक्रमात भारतीय पथक सहभाग घेणार आहे.
विजय दिवस कार्यक्रमाच्या संचलनात सहभागी होण्यासाठी शुक्रवारी भारताच्या तिन्ही दलाचे पथक मॉस्कोला गेले आहे. 24 जूनला रेड स्केअर येथे होणाऱया या कार्यक्रमात भारतीय पथक सहभाग घेणार आहे. कर्नल स्तरावरील अधिकारी या पथकाचे नेतृत्व करणार आहेत. एकूण 75 जवानांचा या पथकात समावेश आहे.
दरवर्षी 9 मे ला विजय दिवस साजरा केला जातो. मात्र, कोरोनामुळे यावर्षी कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. विजय दिवस कार्यक्रम 24 जूनला साजरा होणार असल्याचे रशियाचे अध्यक्ष व्लादिमार पुतिन यांनी 26 मे ला जाहीर केले होते. 24 जून 1945 साली दुसऱ्या महायुद्धात विजय फौजांकडून संचलन करण्यात आले होते. स्टॅलिनग्रॅड शहराचे शत्रुपासून संरक्षण करण्यात आले. युरोपला स्वतंत्र करण्यात आले, त्यामुळे हा दिवस निवडल्याचे रशियाचे परराष्ट्र मंत्री सेरगी शोईगु यांनी सांगितले.