महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

५ वर्षांत भारताने सीमेपलीकडे ३ सर्जिकल स्ट्राईक्स केले  - राजनाथ सिंह

'५ वर्षांत भारताने सीमेपलीकडे ३ सर्जिकल स्ट्राईक्स केले. यातील २ सर्जिकल स्ट्राईक्स सर्वांना माहिती आहेत. मात्र, तिसऱ्याबद्दल मी काही बोलणार नाही,' असे सिंह म्हणाले.

By

Published : Mar 9, 2019, 9:37 PM IST

राजनाथ सिंह

मंगळुरु - पुलवामा हल्ल्यानंतर भारताने केलेल्या हवाई सर्जिकल स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी ठार झाले, याचा पुरावा न दिल्याबद्दल विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. आता केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी '५ वर्षांत भारताने सीमेपलीकडे ३ सर्जिकल स्ट्राईक्स केले,' असे शनिवारी झालेल्या सभेत म्हटले आहे. 'यातील २ सर्जिकल स्ट्राईक्स सर्वांना माहिती आहेत. मात्र, तिसऱ्याबद्दल मी काही बोलणार नाही,' असेही ते म्हणाले.

'एक सर्जिकल स्ट्राईक उरी येथील लष्कराच्या तळावर झालेल्या हल्ल्यानंतर झाला. येथे रात्रीच्या वेळी झोपलेल्या सैनिकांवर हल्ला झाला होता. यात १७ सैनिकांचे प्राण गेले होते. दुसरा पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मदने सीआरपीएफ जवानांच्या बसेसवर केलेल्या आत्मघातकी हल्ल्यानंतर करण्यात आला. यात ४० जवानांना प्राण गमवावे लागल्यानंतर जैशच्या पाकिस्तानातील तळांवर हवाई स्ट्राईक करण्यात आला होता.' हे दोन्ही स्ट्राईक्स सर्वांना माहीत असल्याचे सिंह म्हणाले. 'मात्र, तिसऱ्या स्ट्राईकबद्दल मी काहीही माहिती देणार नाही,' असे ते म्हणाले.

'भारत हा सक्षम देश आहे. आमचे धोरण सरळ आहे. आम्ही कोणाला त्रास देणार नाही. मात्र, कोणी आम्हाला त्रास दिला तर, त्याला सोडणारही नाही,' असे ते म्हणाले. त्यांनी हवाई स्ट्राईकचा पुरावा मागणाऱ्या विरोधकांवर जोरदार हल्ला केला. 'त्यांचा सैनिकांच्या शौर्यावर विश्वास नाही, असे वाटते. आपले वैमानिक पाकिस्तानवर पुष्पवृष्टी करण्यासाठी गेले नव्हते. त्यांना गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार त्यांना दिलेली कामगिरी पार पाडण्यासाठी गेले होते,' असे ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details