नवी दिल्ली -संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, सीएसडी बिपीन रावत आणि लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी लेह आणि लडाखला भेट दिली. लष्कराकडून पॅरा ड्रॉपिंग कौशल्याचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. 'लडाख आणि जम्मू काश्मिरच्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी जात आहे. संबंधित परिसराला भेट देऊन आढावा घेणार आहेत. तसेच लष्करी अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करणार आहे', असेही सिंग यांनी टि्वट करून सांगितले.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग लडाखमध्ये दाखल; एलओसी, एलएसी भागाचा घेणार आढावा - Indian Army
पंतप्रधान मोदींच्या ३ जुलैच्या अचानक झालेल्या दौऱ्यानंतर सिंग यांनी लडाखला भेट दिली. भारत चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर सिंग यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. लडाखमधून संरक्षणमंत्री श्रीनगरला रवाना होतील.
पंतप्रधान मोदींच्या ३ जुलैच्या अचानक झालेल्या दौऱ्यानंतर सिंग यांनी लडाखला भेट दिली. भारत चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर सिंग यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. लडाखमधून संरक्षणमंत्री श्रीनगरला रवाना होतील. त्याठिकाणी लष्कारातील मोठ्या अधिकाऱ्यांशी परिस्थिती जाणून घेण्यासाठी बैठक घेणार असल्याचेही समजते. एलओसीवरील परिस्थिती जाणून घेणार असल्याचेही सिंग यांनी सांगितले. ३ जुलै रोजी सिंग यांचा दौरा नियोजित होता. मात्र, तो अचानक पुढे ढकलण्यात आला.
गलवान खोऱ्यात भारत चीनमध्ये झालेल्या चकमकीत २० भारतीय जवानांना वीरमरण आले होते. यानंतर सीमेवरील तणावात वाढ झाली होती.