नवी दिल्ली - पाकिस्तानला भारताबरोबर छोट किंवा मोठं असं कोणतही यु्द्ध करायला परवडत नाही. त्यामुळे पाकिस्तानने भारताविरुद्ध छुपं युद्ध पुकारलं आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेमध्ये सांगितले. कारगिल युद्धातील शहीदांना आदरांजली वाहिल्यानंतर ते लोकसभेमध्ये बोलत होते.
भारतासमोर टिकाव लागत नसल्यानं पाकिस्तान छुपं युद्ध पुकारलंय - संरक्षणमंत्री - संरक्षणमंत्री
भारतीय लष्करापुढं पाकिस्तानचा टिकाव लागत नसल्यानं त्यांनी छुप युद्ध पुकारलं आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले.
यावेळी सिंह यांनी कारगिल युद्धात लष्कराने दाखवलेल्या शोर्याची प्रशंसा केली. तसेच भारतीय लष्करावर विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले. भारतीय लष्करापुढं पाकिस्तानचा टिकाव लागत नसल्यानं त्यांनी छुप युद्ध पुकारलं आहे, असे सिंग म्हणाले.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही कारगिल युद्धातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली. काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी कारगिल दिवसाच्या निमित्ताने पाकिस्तान प्रश्नावर चर्चेची मागणी केली होती. त्यानंतर राजनाथ सिंह बोलत होते.