नवी दिल्ली -माजी केंद्रीय अर्थ सचिव आणि निवृत्त आयएएस अधिकीरी राजीव कुमार यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काल (शुक्रवार) उशिरा कायदा आणि न्याय मंत्रालयाने त्यांच्या नियुक्तीचे पत्र जारी केले. निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी मंगळवारी राजीमाना दिल्यानंतर राजीव कुमार त्यांची जागा घेणार आहेत.
कुमार हे १९८४ च्या तुकडीचे झारखंड केडरमधील आयएएस अधिकारी आहेत. अशोक लवासा यांनी मंगळवारी राजीमाना दिल्यानंतर त्यांच्या जागी राजीव कुमार त्यांची नियुक्ती करण्यात आली. लवासा हे एशियन विकास बँकेचे उपाध्यक्षपदही भूषवत आहेत. ३१ ऑगस्ट रोजी म्हणजेच लवासा यांच्या कामाच्या शेवटच्या दिवशी राजीव कुमार पदभार स्वीकारणार आहेत.