नवी दिल्ली- राजीव गांधी हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेली आरोपी नलिनी पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आली आहे. मुलीच्या लग्नाच्या तयारीसाठी नलिनीने ६ महिन्यांच्या सुट्टीसाठी अर्ज केला होता. मात्र, मद्रास उच्च न्यायालयाने नलिनीला ३० दिवसांचा पॅरोल मंजूर केला आहे.
मुलीच्या लग्नाच्या तयारीसाठी तिने पॅरोलचा अर्ज केला होता. ५ जुलैला याबाबत न्यायालयाने मागणी मान्य केली होती. मात्र, ६ महिन्यांऐवजी ३० दिवसांची सुट्टी मंजूर केली. कोणत्याही आरोपीला २ वर्षांतून एकदा पॅरोल मंजूर केला जातो. मात्र, मला २७ वर्षाच्या तुरुंगवासात एकदाही सुट्टी मिळाली नाही, असे नलिनीने अर्जात म्हटले होते.