महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीमध्ये चमत्कार घडवणार जनता - रजनीकांत - रजनीकांत यांचे मोठे वक्तव्य

तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकी संदर्भात ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांनी मोठे विधान केले आहे.

रजनीकांत

By

Published : Nov 21, 2019, 6:14 PM IST

Updated : Nov 21, 2019, 11:48 PM IST

चैन्नई -तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकी संदर्भात ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांनी मोठे विधान केले आहे. 2021 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये तामिळनाडूची जनता चमत्कार घडवून आणेल, असे वक्तव्य सुपरस्टार रजनीकांत यांनी केले आहे.


मक्कल नीधी मय्यम (एमएनएम) या राजकीय पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि अभिनेते कमल हसन आणि अभिनेते रजनीकांत तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा आहेत.


रजनीकांत यांनी आपण राजकीय पक्ष स्थापन करणार असून, पुढील विधानसभा निवडणुका लढवण्याचे संकेत दिले आहेत. तर, कमल हसन यांचा एमएनएम हा राजकीय पक्ष आधीच स्थापन झाला आहे. त्यामुळे तमिळनाडूच्या हितासाठी हे दोघे एकत्र येणार म्हणजे, राजकीय युती करणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित होतो आहे.

Last Updated : Nov 21, 2019, 11:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details