महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'आरएमएम'मध्ये प्रवेश करणार सुपरस्टार रजनीकांत?

सुपरस्टार रजनीकांत सोमवारी रजनी मक्कळ मंड्रम (आरएमएम) या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. २०१७मध्ये रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली होती.

Rajinikanth
Rajinikanth

By

Published : Nov 29, 2020, 4:53 PM IST

चेन्नई -सुपरस्टार रजनीकांत सोमवारी रजनी मक्कळ मंड्रम (आरएमएम) या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. या संदर्भातील घोषणा जिल्हा सचिवांच्या बैठकीत करणार असल्याची माहिती आहे.

आपल्या राजकीय प्रवेशासंदर्भात ऑक्टोबर महिन्यातच त्यांनी सूचित केले होते. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव तसेच कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी त्यांना घरी थांबण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी रजनीकांत यांना पत्राद्वारे हे कळविले होते.

अमित शाहंशी होणार चर्चा

रजनीकांत यांना मूत्रपिंडाचा आजार असल्याने त्यांच्या डॉक्टरांकडून त्यांना प्रवास करण्यास प्रतिबंध घालण्यात आला होता. मागील आठवड्यात गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत अण्णा द्रमूक पक्षाची बैठक झाली. राज्यात एआयएडीएमकेची भाजपाशी युती आहे. दुसरीकडे, शाह आणि रजनीकांत यांच्यात अद्याप बैठक झालेली नाही. त्यांच्यात चर्चा झाल्यानंतरच रजनीकांत यांची भूमिका स्पष्ट होईल.

२०१७मध्ये रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली होती. विधानसभेच्या २३४ जागा लढणार असल्याचेही ते म्हणाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details