चेन्नई - दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी ई.व्ही. रामास्वामी पेरियार यांच्या एका रॅलीविषयी केलेल्या विधानावरून तामिळनाडूमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. द्रविड विधुतलाई कळगम यांच्याकडून रजनीकांत यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेली तक्रार मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
द्रविड विधुतलाई कळगम यांनी रजनीकांत यांच्याविरोधात दाखल तक्रार दाखल केली होती. त्यावर आज मद्रास उच्च न्यायलयात सुनावणी झाली. न्यायालयाने संबधीत तक्रार फेटाळली आहे. तसेच जिल्हा न्यायालयात तक्रार दाखल न करता, सर्वोच्च न्यायालयात येण्याची घाई का केली, असा सवाल मद्रास उच्च न्यायालयाने द्रविड विधुतलाई कळगम या संघटनेला विचारला.
हेही वाचा -पर्यावरण रक्षणासाठी रायचूर शहरात नलिनी वाटतात मोफत कापडी पिशव्या
काय प्रकरण ?
मागील आठवड्यात एका तमिळ मासिकाला रजनीकांत यांनी मुलाखत दिली होती. या मुलाखतीत बोलताना रजनीकांत यांनी ई. व्ही. रामास्वामी पेरियार यांच्या एका रॅलीविषयी वक्तव्य केलं होतं. '१९७१ मध्ये रामास्वामी पेरियार यांनी सलेममध्ये रॅली काढली होती. त्या रॅलीमध्ये राम आणि सीता यांचे वस्त्रहीन फोटो लावण्यात आले होते', असं रजनीकांत यांनी सांगितले होते. त्यांच्या या विधानावर द्रविड विधुतलाई कळगम या संघटनेनं आक्षेप घेत निदर्शन सुरू केली असून रजनीकांत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. 'मी केलेलं वक्तव्य खरे असून अनेक माध्यमांमध्ये ते प्रकाशित झाले आहे. त्यामुळे मी माफी मागणार नाही' , अशी भूमिका रजनीकांत यांनी घेतली आहे.
हेही वाचा -नरेंद्र मोदी घेणार ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कार’ २०२० च्या विजेत्या मुलांची भेट