महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

रजनीकांत आणि कमल हसन यांनी ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाबाबत व्यक्त केले दु:ख - सुपरस्टार रजनीकांत

ज्येष्ठ बॉलीवुड अभिनेते ऋषी कपूर यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर देशभरातून अनेक चाहत्यांनी आणि मान्यवरांनी ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली. दक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हसन यांनी देखील ऋषी कपूर यांच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त केले आहे.

Rishi Kapoor
ऋषी कपूर

By

Published : Apr 30, 2020, 1:52 PM IST

बंगळूरू - ज्येष्ठ बॉलीवुड अभिनेते ऋषी कपूर यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर देशभरातून अनेक चाहत्यांनी आणि मान्यवरांनी ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली. दक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील मान्यवरांनाही ऋषी कपूर यांच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त केले आहे.

सुपरस्टार रजनीकांत यांनी ट्विट करत ऋषी कपूर यांच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त केले. "मला अतिशय दु:ख होत आहे...माझ्या मित्रा तुझ्या आत्म्यास शांती लाभो" असे ट्विट रजनीकांत यांनी केले आहे.

अभिनेते कमल हसन यांनी देखील ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. "मला विश्वास बसत नाही चिंटूजी(ऋषी कपूर)...कायम हसतमुख राहणाऱया तुमच्याशी नेहमी मैत्रीचे चांगले नाते होते" अशा शब्दांत कमल हसन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

बुधवारी प्रकृती बिघडल्याने ऋषी कपूर यांना सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

ABOUT THE AUTHOR

...view details