नवी दिल्ली -रजत शर्मा यांनी डीडीसीएच्या (Delhi & Districts Cricket Association) अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. पत्रकार रजत शर्मा यांच्या विरोधात डीडीसीएच्या इतर संचालकांनी प्रस्ताव पारित करून त्यांचे अधिकार काढून घेतले होते. हे त्यांनी राजीनामा देण्याचे मुख्य कारण मानले जात आहे. शर्मा यांनी डीडीसीएमधून राजीनामा दिल्याची माहिती आपल्या ट्विटर अकाउंटवरून दिली.
रजत शर्मांनी दिला डीडीसीएच्या अध्यक्षपदाचा राजीनामा - rajat sharma tweet
शर्मा यांनी 'डीडीसीए'मधून राजीनामा दिल्याची माहिती आपल्या ट्विटर अकाउंटवरून दिली. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती झाली आहे. यानंतर काही दिवसांतच शर्मा यांचा राजीनामा आला आहे.
रजत शर्मा यांचे वक्तव्यही समोर आले आहे. 'येथे क्रिकेट प्रशासनात नेहमी ओढाताणीचा आणि दबावाचा अनुभव येत आहे. डीडीसीएमध्ये प्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेच्या तत्त्वांसह चालणे शक्य नाही, असे वाटते. अशा बाबींशी मी समझोता करू शकत नाही,' असे त्यांनी म्हटले आहे.'माझ्या कार्यकाळादरम्यान मला अनेकदा विरोधाचा सामना करावा लागला. मला निष्पक्ष आणि पारदर्शकपणे स्वतःचे काम करण्यापासून अनेकदा अडवण्यात आले,' असे त्यांनी पुढे म्हटले आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती झाली आहे. यानंतर काही दिवसांतच शर्मा यांचा राजीनामा आला आहे.
TAGGED:
rajat sharma tweet