बुंदी (राजस्थान)- देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. त्यामुळे, देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यानुसार लोकांनी घरी राहून गर्दी टाळणे अपेक्षित आहे. मात्र, जिल्ह्यातील लखेरी या गावात एका तांत्रिकाने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला हजेरी लावून ग्रामस्थांनी शासनाच्या आदेशांचे उल्लंघन केले आहे.
लखेरी येथे भोपा नावाच्या तांत्रिकाने गावातील एका मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. काळ्या जादूच्या माध्यमातून मी तुम्हाला नौकरी मिळवून देऊ शकतो, तुमची प्रकृती ठिक करू शकतो, त्याचबरोबर तुम्हाला तुमचे प्रेम देखील मिळवून देऊ शकतो, अशी खोटी आश्वासने तांत्रिक भोपा याने ग्रामस्थांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहून मंदिरातील काही लोक पळून गेले तर काही लोक भोपा सोबत मंदिरातच थांबले होते.