जयपूर -राजस्थान विधानसभेतील बहुजन समाज पक्षाच्या ६ आमदारांना पक्षाने व्हिप (पक्षादेश) जारी केला आहे. गेल्यावर्षी सदर आमदारांनी राजस्थानातील सत्ताधारी काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याची घोषणा केली होती. संबंधित आमदारांना विधानसभेच्या सर्व कामकाजात आणि अविश्वास प्रस्तावादरम्यानसुद्धा मुख्यमंत्री गेहलोत यांच्याविरोधात मतदान करावे, असेही पक्षाकडून सांगण्यात आले आहे. बसपच्या तिकिटावर निवडून आलेल्या राजेंद्र गुढा, लखन मीना, दीपचंद खेरिया, संदीप यादव, जे.एस.अवना आणि वाजिब अली यांनी राज्यात काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर काँग्रेसमध्ये विलिनीकरण केले होते.
गेहलोत यांच्या विरोधात मतदान करा: बसपच्या 'त्या' आमदारांना व्हिप जारी - Ashok gehlot
बसपच्या तिकिटावर निवडून आलेल्या राजेंद्र गुढा, लखन मीना, दीपचंद खेरिया, संदीप यादव, जे.एस.अवना आणि वाजिब अली यांनी राज्यात काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर काँग्रेसमध्ये विलिनीकरण केले होते.
संबंधित आमदारांना पक्षाच्या व्हिपनुसार वागणूक करावी लागेल, असेही बसपकडून अधिकृतपणे सांगण्यात आले आहे. 'सर्व ६ आमदारांना व्यक्तिगतरित्या नोटीस बजावली आहे. बसप हा राष्ट्रीय पक्ष आहे. अद्यापही पक्षाकडून राष्ट्रीय स्तरावर अशाप्रकारे कुठल्याही पक्षासोबत विलिनीकरण करण्याबाबत स्पष्ट भूमिका जारी केली नाही. त्यामुळे व्यक्तिगतरित्या आमदार असा निर्णय घेऊ शकत नाहीत. हा सर्व प्रकार घटनाबाह्य आहे, असे बसपने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.