महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राजस्थानचे सत्तानाट्य सर्वोच्च न्यायालयात; विधानसभा अध्यक्ष याचिका दाखल करणार

मंगळवारी उच्च न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पक्षविरोधी काम करणाऱ्या आमदारांवर कारवाई न करण्याचा आदेश सीपी जोशी यांना दिला होता.त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

Rajasthan political crisis
राजस्थान सत्तानाट्य

By

Published : Jul 22, 2020, 11:31 AM IST

जयपुर- राजस्थानचे विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी सचिन पायलट आणि 18 आमदारांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने निर्णय दिला होता.

उच्च न्यायालयाने जोशी यांना पक्षविरोधी काम करणाऱ्या आमदारांविरोधात शुक्रवारपर्यंत कारवाई न करण्याचा आदेश दिला.

काँग्रेस नेते सचिन पायलट आणि 18 आमदारांनी पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी यांनी बजावली होती. यानंतर सचिन पायलट यांच्यासह 18 आमदारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सीपी जोशी यांनी विधिमंडळात जाऊन वकिलांचा सल्ला घेतला होता. सीपी जोशी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. आमदारांना नोटीस बजावण्याचा अधिकार अध्यक्षांना असतो, असे जोशी यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details