जयपूर - राजस्थानातील अशोक गेहलोत सरकार पाडण्याचा प्रयत्न विरोधक करत असल्याचे प्रकरण राज्यात चांगलेच गाजत आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शनिवारी रात्री उशिरा आपल्या निवासस्थानी सर्व मंत्र्याची बैठक घेतली.
सीएम अशोक गेहलोत यांनी शनिवारी रात्री साडेआठ वाजता कॅबिनेट मंत्र्यांची बैठक बोलावली. सुमारे 2 तास चाललेल्या या बैठकीत राजस्थान सरकारचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट उपस्थित नव्हते. बैठकीच्या माध्यमातून अशोक गेहलोत यांनी सरकारवर आपली पकड दाखवायचा प्रयत्न केला. परंतु, सचिन पायलटच्या अनुपस्थितीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.