महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे आमदारांना खुले पत्र - अशोक गेहलोत यांचे आमदारांना खुले पत्र

राजस्थानमधील राजकीय गोंधळात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राजस्थानातील सर्व आमदारांना एक खुले पत्र लिहिले आहे. जनतेच्या आवाजाकडे लक्ष द्यावे आणि लोकशाही वाचविण्याच्या दिशेने काम करावे, असे आवाहन त्यांनी आमदारांना पत्राच्या माध्यमातून केले आहे.

राजस्थान राजकीय संघर्ष
राजस्थान राजकीय संघर्ष

By

Published : Aug 10, 2020, 7:13 AM IST

जयपूर - राजस्थानमधील राजकीय गोंधळात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राजस्थानातील सर्व आमदारांना एक खुले पत्र लिहिले आहे. जनतेच्या आवाजाकडे लक्ष द्यावे आणि लोकशाही वाचविण्याच्या दिशेने काम करावे, असे आवाहन त्यांनी आमदारांना पत्राच्या माध्यमातून केले आहे. 11 आणि 14 ऑगस्टला सरकारला निर्णायक विजय मिळेल, असेही गेहलोत यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

गेहलोत रविवारी जयपूरहून जैसलमेरला पोहोचले. आमदारांच्या भेटीदरम्यान गेहलोत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपचा खोटेपणा उघडकीस आला आहे. फोन रेकॉर्डिंगदेखील या मोठ्या षडयंत्रातला एक भाग असल्याचे ते म्हणाले. तसेच गेहलोत यांनी सर्व आमदारांना एक खुले पत्र लिहित, जनतेच्या आवाजाकडे लक्ष देऊन लोकशाही वाचविण्याच्या दिशेने काम करण्याचे आवाहन केले.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या पत्राबद्दल भाजपच्या उच्चपदस्थ नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. जेव्हा संधीची दारे सर्व बाजूंनी बंद केली जातात, तेव्हा मोठी निराशा दिसून येते, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया म्हणाले.

14 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या अधिवेशानाच्या पार्श्वभूमीवर येत्या मंगळवारी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी याबाबत भाजपच्या आमदारांना पत्र पाठवत, 11 ऑगस्टला दुपारी 4 वाजता जयपूरच्या हॉटेल क्राऊन प्लाझा येथे उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details