उदयपूर- राजस्थान पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने 1 कोटी 25 लाख रुपये जप्त केले आहेत. स्पेशल ऑपरेशन ग्रुप अशोक गेहलोत सरकार पाडण्याच्या प्रयत्नात झालेल्या घोडेबाजार प्रकरणाची चौकशी करत आहे.
उदयपूर मध्ये पैशांची देवाण घेवाण होणार असल्याची माहिती स्पेशल ऑपरेशन ग्रुपला मिळाली होती. विकास शर्मा यांच्या नेतृत्वात सीआयडीच्या पथकाने ही रक्कम जप्त केली. दोन कारमधून ही रक्कम नेत असताना तिघांना अटक करण्यात आली. प्राथमिक तपासात ही रक्कम जमीनच्या व्यवहारासंबंधी असल्याचे स्पष्ट झाले.