जयपूर - राजस्थान सरकार १४ एप्रिलनंतरही राज्यातील लॉकडाऊन सुरू ठेवणार आहे. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने राज्यातील लॉकडाऊन हटवण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.
याच्या पहिल्या टप्प्यामध्ये सर्व अत्यावश्यक सेवांशी निगडित असलेले सर्व सरकारी विभाग खुले केले जातील. तसेच, सरकारी कर्मचाऱ्यांना एक दिवसाआड काम करण्याची मुभा देण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
तसेच, लहान मुले आणि वयोवृद्धांना घरातच राहण्याबाबत सूचना देणारे परिपत्रक सरकारकडून जारी करण्यात येणार असल्याचीही माहिती मिळाली आहे. यासोबतच मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यात कलम १४४ लागू ठेवण्याचा सरकारचा विचार असल्याची माहितीही सूत्रांकडून समजली आहे.