खळबळजनक : राजस्थानमधील जे. के लोन रुग्णालयात अर्भक मृत्यूंचा आकडा १०७ वर; केंद्रीय आरोग्य पथक दाखल - राजस्थान अर्भक मृत्यू बातमी
राजस्थानमधील जे. के लोन रुग्णालयात मागील एक महिन्यापासून १०७ अर्भकांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे एक पथक अर्भकांच्या मृत्यूप्रकरणी चौकशी करण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले आहे.

संग्रहित छायाचित्र
जयपूर - राजस्थानमधील जे. के लोन रुग्णालयात मागील एक महिन्यापासून अर्भकांचा मृत्यू होत आहे. आत्तापर्यंत १०७ अर्भकांचा मृत्यू झाल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला खडबडून जाग आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे एक पथक अर्भकांच्या मृत्यूप्रकरणी चौकशी करण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले आहे.
जोधपूरमधील एम्स रुग्णालयाचे बालरोग तज्ज्ञ डॉ. कुलदीप सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पथक पाठवण्यात आले आहे. यामध्ये डॉ. हिमांशू, डॉ. अनिल, डॉ. वारिशा आणि अरुण सिंह यांचा समावेश आहे.
राजस्थानमधील जेके लोन रुग्णालयात अर्भक मृत्यूंचा आकडा १०७ वर