नवी दिल्ली -राजस्थानात १३१० शरणार्थींना भारतीय नागरिकत्व मिळाले आहे. गृह राज्यमंत्री नित्यांनद राय यांनी ही माहिती दिली. 'यापैकी ८२ जणांना राजस्थान सरकार, १११३ जणांना जोधपूरचे जिल्हाधिकारी, ७ जणांना जैसलमेर आणि १०८ जणांना जयपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकत्व देण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे,' असे ते म्हणाले.
'राजस्थानातील जोधपूर, जैसलमेर आणि जयपूरसह १६ जिल्हे आणि ७ राज्यांमध्ये कायदेशीर प्रवाशांशी संबंधित पंजीकरण किंवा प्राकृतिकीकरणाद्वारे भारतीय नागरिकत्व दिले जाऊ शकते, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत,' अशी माहिती राय यांनी एका लिखित उत्तरात दिली आहे.