राजस्थान- उत्तर प्रदेशमधील साक्षीप्रमाणेच आता राजस्थानच्या 'उमंग'ने देखील लग्नानंतर नातेवाईकांनी आपल्याला त्रास देऊ नये, अशी मागणी करणारा व्हिडिओ प्रसारित केला आहे. जो आता व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमधील महिला आपले नाव उमंग सांगत आहे, तसेच ती पचेरीकला गावची रहिवासी असल्याचे सांगत आहे.
व्हिडिओमध्ये तिने दोन तारखेला सतीश कुमार नावाच्या व्यक्तीसोबत कोर्ट मॅरेज केल्याचे सांगत, ती लग्नासंबंधी सर्व कागदपत्रेही दाखवत आहे. तसेच, आपल्या परिवाराकडून आपल्याला धोका असल्याचे सांगत, आपल्याला काही झाल्यास त्यास आपले नातेवाईक जबाबदार असतील असेही ती म्हणत आहे. तसेच व्हिडिओमध्ये तिच्या शेजारी सतीश कुमार देखील बसलेला दिसून येत आहे.