जयपूर :राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सोमवारी पुन्हा एकदा राज्यातील परिस्थितीबाबत पायलट यांना जबाबदार ठरवले आहे. गेहलोत म्हणाले, की पायलट यांनी पक्षाच्या अध्यक्षपदी असूनही सरकार पाडण्याचा कट रचला. गेल्या १०-१२ वर्षांमध्ये पक्षाने त्यांना सर्वकाही दिले असतानाही त्यांनी असे केले. मी याबाबत पक्षातील लोकांना आधीही बोललो होतो, मात्र तेव्हा माझ्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही.
आपल्यामुळेच राजस्थानात काँग्रेस सरकार निवडून आले, असे पायलट वारंवार म्हणत आहेत. मात्र ते कित्येक दिवसांपासून काँग्रेसविरोधात कट रचत होते. या सर्व कटात भाजपचाही त्यांना पाठिंबा होता. जर राज्यात पोटनिवडणुका झाल्या, तर पायलट यांचे समर्थन असलेल्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये भाजप आपला उमेदवार उभा करणार नाही, असा ठराव यांच्यामध्ये झाल्याचा आरोपही गेहलोत यांनी केला आहे.
सचिन पायलट कुचकामी आणि दगाबाज; गहलोत यांचे गंभीर वक्तव्य.. पायलट हे कुचकामी आणि दगाबाज..
मुख्यमंत्री गेहलोत पुढे म्हणाले, की गेल्या सात वर्षांमध्ये केवळ राजस्थानच असे राज्य आहे, जिथे पक्षाचा प्रदेश अध्यक्ष बदला अशी मागणी कोणी केली नाही. सर्वांना माहित होते, की पायलट एकदम कुचकामी आणि दगाबाज आहेत मात्र, तरीही त्यांना बदलण्याची मागणी आम्ही केली नाही.
सचिन पायलट कुचकामी आणि दगाबाज; गहलोत यांचे गंभीर वक्तव्य.. मुंबईतील कॉर्पोरेट हाऊसही पायलट यांची मदत करत..
एआयसीसीचे अध्यक्षपद मिळवण्यासाठीही मुंबईमधील कॉर्पोरेट हाऊसेस पायलट यांची मदत करत होते, असा आरोपही गेहलोत यांनी यावेळी केला. हरीश साळवे आणि मुकुल रोहतगी हे कॉर्पोरेटचेच वकील आहेत, ज्यांची निवड पायलट यांनीच केली आहे. हा सर्व कट भाजपला खुश ठेवण्यासाठी होतो आहे. ज्याप्रमाणे सचिन पायलट सर्व सुरक्षाव्यवस्था इथेच सोडून गुपचूप आपल्या गाडीने दिल्लीला जात, त्याचप्रमाणे भाजपचे सतीश पूनिया आणि राजेंद्र राठौडही दिल्लीला जाऊन आले. मात्र आता ते आपण दिल्लीला गेलोच नसल्याचा कांगावा करत आहेत.
आमदारांना ओलीस ठेवले आहे..
सचिन पायलट यांच्या गटातील काही आमदार आता परत येण्यास इच्छुक आहेत. मात्र या आमदारांना त्यांनी बंदी बनवून ठेवले आहे. एखाद्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष आपलेच सरकार पाडण्यासाठी एवढा प्रयत्न करत असल्याचे आपण कधी ऐकलेही नाही. आमच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवल्याचा खर्च तर पक्षाकडून केला जाईल. मात्र, त्या आमदारांचा खर्च कोण करत आहे? शेवटी सत्याचाच विजय होतो, असे गेहलोत यावेळी म्हणाले.