जयपूर- दारूबंदीला माझे वैयक्तिक समर्थन आहे. याआधीही गुजरातमध्ये दारुबंदी करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी ती यशस्वी झाली नाही. गुजरातच्या घराघरांत आज दारू पिली जाते, असे वक्तव्य राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केले आहे.
यासोबतच ते म्हणाले, की गुजरातमध्ये स्वातंत्र्यानंतरच दारुबंदी करण्यात आली होती. मात्र, आज अशी परिस्थिती आहे, की गुजरातमध्येच सर्वात जास्त दारूचा खप होतो आहे. गुजरातच्या घराघरांमध्ये दारू पिली जाते. गांधींच्या गुजरातची आज ही परिस्थिती झाली आहे. दारुबंदीचे स्वागतच आहे, मात्र काही ठोस उपाय केल्याशिवाय दारुबंदीचा काही फायदा होईल, असे वाटत नाही.