महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पाकिस्तानच्या तुरुंगातून 'तो' ६ वर्षांनी परतला; चुकून ओलांडली होती वाघा बॉर्डर

सहा वर्षांपूर्वी वाघा सीमेच्या परिसरात जंगल भागात असलेल्या रामदेवरा मंदिरामध्ये तो प्रार्थनेसाठी गेला होता. तेथून बाहेर पडल्यानंतर रस्ता चुकल्याने त्याने चुकून सीमारेषा ओलांडून पाकिस्तानच्या भागात प्रवेश केला.

बुंडी

By

Published : May 6, 2019, 11:50 AM IST

Updated : May 6, 2019, 1:33 PM IST

बुंडी - पाकिस्तानच्या कराचीमधील तरुंगात कैदेत असलेला तरुण रविवारी मायदेशी परतला. पाकिस्तानच्या तो ६ वर्षे कैदेत होता. राजस्थानच्या बुंडी जिल्ह्यातील झाकमुंडा रामापुरीया या गावचा हा तरुण रविवारी त्याच्या घरी दाखल झाला. सहा वर्षांनी आणि तेही पाकिस्तानच्या कैदेतून सहीसलामत परत आल्याने नातेवाईकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जुगराज भिल असे त्या तरुणाचे नाव आहे.

सहा वर्षांपूर्वी वाघा सीमेच्या परिसरात जंगल भागात असलेल्या रामदेवरा मंदिरामध्ये तो प्रार्थनेसाठी गेला होता. तेथून बाहेर पडल्यानंतर रस्ता चुकल्याने त्याने चुकून सीमारेषा ओलांडून पाकिस्तानच्या भागात प्रवेश केला. त्यावेळी पाकिस्तानच्या लष्काराकडून त्याला अटक करण्यात आली होती.

कित्येक दिवसांपासून त्याचा काहीच ठाव-ठिकाणा लागत नसल्याने तेथील काही स्थानिकांनी मोहीम काढून केंद्र सरकारकडे त्याच्या सुटकेची मागणी केली होती. तो वाघा सीमेवर आल्यानंतर त्याला घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते धर्मेश यादव आणि त्याचा भाऊ बाबूलाल भिल गेले होते. घरी आणल्यानंतर त्याने अद्याप एकही शब्द बोललेला नाही. दोन दिवसांपासून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मात्र, वाघा सीमेवरून घरी आणल्यापासून त्याने भाऊ बाबूलाल वगळता कोणाला ओळखलेले नाही.

Last Updated : May 6, 2019, 1:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details