जयपूर - भारतीय लष्कराने राजस्थानच्या श्री गंगानगर सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेचे उल्लंघन करून भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी करणारे पाकिस्तानचे ड्रोन पाडले. लष्कराच्या सूत्रांनी ही माहिती दिली.
राजस्थानात भारतीय लष्कराने पाकिस्तानचे ड्रोन पाडले - pakistani drone
हवाई स्ट्राईकनंतर भारतीय सुरक्षा दलांकडून पाडण्यात आलेले हे पाकिस्तानचे तिसरे ड्रोन आहे. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात घुसखोरी करणारे पाकिस्तानचे पहिले ड्रोन तर, गेल्या सोमवारी राजस्थातील बीकानेर येथे दुसरे ड्रोन पाडण्यात आले.
भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी करणारे हे ड्रोन पाडण्यात आले, असे लष्कराच्या सूत्रांनी सांगितली. २६ फेब्रुवारीला भारताने पाकिस्तानच्या भूमीवरील जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर हवाई स्ट्राईक केला होता. या स्ट्राईकनंतर भारतीय सुरक्षा दलांकडून पाडण्यात आलेले हे पाकिस्तानचे तिसरे ड्रोन आहे.
२६ फेब्रुवारीला सकाळी भारतीय लष्कराने गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात घुसखोरी करणारे पाकिस्तानचे पहिले ड्रोन पाडले होते. गेल्या सोमवारी राजस्थातील बीकानेर येथे दुसरे ड्रोन पाडण्यात आले.