नवी दिल्ली - राजस्थानच्या अलवरमध्ये २ वर्षांपूर्वी पेहलू खान याची गाईंचा तस्कर असल्याच्या संशयातून बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाला आता राजकीय वळण लागले आहे. पेहलू खान याच्यावर बेकायदेशीररीत्या गुरांची वाहतूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. राजस्थान पोलिसांवर आणि राजस्थान सरकारवर यामुळे मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. आता मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यात भाजप सरकार असतानाच 'पेहलू खान याच्यावर आरोपपत्र दाखल झाल्याचे' सांगत हात झटकले आहेत.
मॉब लिंचिंगचा बळी पेहलू खानसह त्यांच्या मुलांवर चार्जशीट प्रकरणी राजस्थान सरकारने हात झटकले - pehlu khan
'या प्रकरणाची चौकशी भाजप सरकारच्याच काळात सुरू झाली होती. हे आरोपपत्रही तेव्हाचेच आहे. पेहलू खान यांच्यावरचा आरोप सिद्ध झाला नव्हता. मात्र, ही चौकशी काही विशिष्ट हेतूपूर्वक केली गेली होती का, याचा शोध घ्यावा लागेल,' असे गेहलोत यांनी म्हटले आहे.
'या प्रकरणाची चौकशी भाजप सरकारच्याच काळात सुरू झाली होती. हे आरोपपत्रही तेव्हाचेच आहे. पेहलू खान यांच्यावरचा आरोप सिद्ध झाला नव्हता. मात्र, ही चौकशी काही विशिष्ट हेतूपूर्वक केली गेली होती का, याचा शोध घ्यावा लागेल,' असे गेहलोत यांनी म्हटले आहे. एप्रिल २०१७ मध्ये पेहलू खान जयपूर येथून गाय खरेदी करून हरियाणा येथील आपल्या घरी निघाले होते. या प्रकरणी पोलिसांनी २ प्राथमिक तक्रारी दाखल करून घेतल्या आहेत. यातील एक तक्रार पेहलू यांच्यावर हल्ला करणाऱ्या ८ लोकांवर दाखल करण्यात आली आहे. तर, दुसरी गाय गेऊन चाललेल्या पेहलू आणि त्यांच्या २ मुलांविरोधात दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार जिल्हाधिकाऱयांच्या परवानगीशिवाय दाखल झाली आहे.
पेहलू खान यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्याविरोधातील तक्रार रद्द होईल. मात्र, त्यांच्या मुलांविरोधात खटला चालेल.