जयपूर– राजस्थानमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. बरान जिल्ह्यात 5 वर्षाच्या मुलीवर 19 वर्षाच्या मुलाने बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडितेवरील अत्याचाराची घटना शहाबाद परिसरात मंगळवारी सायंकाळी घडली आहे.
शहाबादचे सर्कल अधिकारी काजोडमाल यांच्या माहितीनुसार अत्यंत गंभीर जमखी अवस्थेत पीडितेला बारान जिल्हा रुग्णालयात मंगळवारी रात्री दाखल करण्यात आले. त्यानंतर पीडितेला कोटामधील जे. के. लोन रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. पीडितेवर बुधवारी दुपारी शस्त्रक्रिया करण्यात आली. पीडितेवर आणखी दोन शस्त्रक्रिया कराव्या लागणार असल्याची अधिकाऱ्याने माहिती दिली.