जयपूर -राजस्थानातील चुरु जिल्ह्यात एकाच कुटुंबातील तब्बल 25 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. एकाच कुटुंबात एवढे रुग्ण सापडल्यानंतर प्रशासनाने सुरजगड शहरात निर्बंध लागू केले आहेत. तसेच परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत 563 कोरोना बाधित आढळून आले आहेत.
राजस्थान: चुरु जिल्ह्यात एकाच कुटुंबातील 25 जणांना कोरोनाची बाधा - राजस्थान कोरोना अपडेट
एकाच कुटुंबात एवढे रुग्ण सापडल्यानंतर प्रशासनाने सुरजगड शहरात निर्बंध लागू केले आहेत. तसेच परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत 563 कोरोना बाधित आढळून आले आहेत.
कुटुंबातील सर्व 25 जणांवर कोरोना रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शुक्रवारी कुटुंबातील 86 जणांची चाचणी घेण्यात आली होती. त्यातील 25 नमुने सकारात्मक आढळून आले आहेत. या कुटुंबातील दोन व्यक्ती हरिद्वार येथे अस्थी विसर्जन कऱण्यास गेले असताना त्यांना कोरोना झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, त्यानंतर कुटुंबातील आणखी 23 जणांचा कोरोनाची लागण झाली. त्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.
सुरजगडमधील बगाडीया रुग्णालयाचे डॉ. दिलीप सोनी म्हणाले, ' कुटुंबातील दोन व्यक्ती अस्थी विसर्जन करण्यासाठी हरिद्वार येथे गेले होते. त्यांनंतर त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर आम्ही कुटुंबातील इतर सदस्यांची चाचणी घेतली. तेव्हा यातील अनेक जण कोरोना प़ॉझिटिव्ह आढळून आले'. राजस्थान राज्यात कोरोनाचे 9 हजार 379 अॅक्टिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर 613 जणांचा मृत्यू झाला आहे. 25 हजार 306 जण उपचारानंतर बरे झाले आहेत.