नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने बाईक रॅलीचे आयोजन काढण्यात आले आहे. प्रसिद्ध महिला बाईकर राज लक्ष्मी यांच्या नेतृत्वात ही बाईक रॅली काढण्यात आली आहे. नवी दिल्ली ते पंतप्रधान मोदी यांचे जन्मस्थान असलेले गुजरात येथील वडनगरपर्यंत ही बाईक रॅली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 17 स्पटेंबरला आहे.
पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त महिला बाईकर राज लक्ष्मींच्या नेतृत्वात दिल्ली ते वडनगर बाईक रॅली
प्रसिद्ध महिला बाईकर राज लक्ष्मी यांच्या नेतृत्वात ही बाईक रॅली काढण्यात आली आहे. नवी दिल्ली ते पंतप्रधान मोदी यांचे जन्मस्थान असलेले गुजरात येथील वडनगरपर्यंत ही बाईक रॅली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 17 स्पटेंबरला आहे.
हेही वाचा - नक्षल्यांचा बुधवारी बंद पाळण्याचे आवाहन, बालाघाट येथे आढळली पत्रके
भाजप खासदार विजय गोयल यांनी या बाईक रॅलीला रविवारी हिरवा झेंडा दाखवला आहे. प्रसिद्ध महिला बाईकर राज लक्ष्मी या रॅलीचे नेतृत्व करत असून त्या्ंच्या नावावर अनेक गिनीज बुकमध्ये विक्रम नोंदवण्यात आले आहेत. 5 दिवसांमध्ये 4 राज्यांमधून ही रॅली वडनगर येथे पोहचेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याची तसेच प्लास्टिकमुक्त भारतासाठी जनजागृती करण्यासाठी या रॅलीचे मुख्य उद्देश आहे.