महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राजस्थान उच्च न्यायालयाच्या एका अधिकाऱ्यास कोरोनाची लागण, न्यायलयीन कामकाजास ३ मेपर्यंत स्थगिती

राजस्थान उच्च न्यायालयातील न्यायालयीन कामकाजादरम्यान न्यायाधीशांच्या थेट संपर्कात असणाऱ्या मुख्य अधिकाऱ्यांपैकी एक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या कामकाजाला ३ मेपर्यंत स्थगीती देण्यात आली

राजस्थान उच्च न्यायालयाच्या एका अधिकाऱ्यास कोरोनाची लागण, न्यायलयीन कामकाजास ३ मेपर्यंत स्थगिती
राजस्थान उच्च न्यायालयाच्या एका अधिकाऱ्यास कोरोनाची लागण, न्यायलयीन कामकाजास ३ मेपर्यंत स्थगिती

By

Published : Apr 26, 2020, 10:09 AM IST

जोधपूर - राजस्थाच्या उच्च न्यायालयातील न्यायधिशांच्या मुख्य अधिकाऱ्यांपैकी एका जणास कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर दक्षता घेत शनिवारी उच्च न्यायालयाचे कामकाज येत्या ३ मेपर्यंत स्थगित करण्यात येणार असल्याचे एक अधिसूचना काढण्यात आली आहे.

राजस्थान उच्च न्यायालयातील न्यायालयीन कामकाजादरम्यान न्यायाधीशांच्या थेट संपर्कात असणाऱ्या मुख्य अधिकाऱ्यांपैकी एक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या कामकाजाला ३ मेपर्यंत स्थगीती देण्यात आली आहे. याबाबत शनिवारी एक अधिसूचना जारी करण्यात आली होती. ज्यामध्ये तातडीच्या महत्वपूर्ण खटल्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही खटल्यांवर ३ मेपर्यंत सुनावणी होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, या अधिकाऱ्यांच्या संपर्कात येणाऱ्या न्यायाधिशांचीदेखील चाचणी घेण्यात आली असून त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details