महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

येत्या दोन ते तीन दिवसांत कर्नाटकात मुसळधार पावसाचा इशारा; यलो अलर्ट जारी - कर्नाटकात यलो अलर्ट जारी

20 ते 23 ऑक्टोबर दरम्यान देशातील सर्व भागात पाऊस पडण्याची शक्यता असून कर्नाटकातील उत्तरा कन्नड, उडुपी आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यात 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे

कर्नाटक
कर्नाटक

By

Published : Oct 21, 2020, 5:55 PM IST

बंगळुरू -राज्याच्या उत्तरेकडील भूभागातील जवळजवळ सर्व ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविला गेला आहे. दक्षिणेकडील अंतर्गत व किनारपट्टी भागात काही ठिकाणी पाऊस पडला. रायचूर जिल्ह्यात 7 सेंमी, चिंतामणी 4 सेंमी आणि शिरहट्टी 3 सेंमी पाऊस झाल्याचे हवामान विभागाचे प्रादेशिक विभाग संचालक सी. एस. पाटील यांनी सांगितले.

22 ते 24 ऑक्टोबरदरम्यान, जोरदार पावसाची शक्यता आहे. शिमोगा, धारवाड, हवेरी, गाडाग, बागलकोट, रायचूर, दावणगेरे, बेल्लारी, चित्रदुर्ग आणि तुमकूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला गेला आहे.

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ आल्याने कर्नाटकाला पावसाचा फटका बसला आहे. 20 ते 23 ऑक्टोबर दरम्यान देशातील सर्व भागांत पाऊस पडण्याची शक्यता असून उत्तरा कन्नड, उडुपी आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यात 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. 24 ऑक्टोबरला पाऊस कमी होणे अपेक्षित आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details