महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दिल्लीत हलक्या स्वरुपाचा पाऊस; तर वायू गुणवत्ता निर्देशांक 450वर - दिल्लीत पाऊस

दिल्लीत हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला आहे. तर, शनिवारी रात्री फटाके फोडल्यामुळे प्रदूषणात वाढ झाली असून वायू गुणवत्ता निर्देशांक 450 वर पोहचला आहे. त्यामुळे विना-वॉल्व्हचे एन-९५ मास्क वापरण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्लीकरांना दिला आहे.

दिल्लीत पाऊस
दिल्लीत पाऊस

By

Published : Nov 15, 2020, 5:59 PM IST

नवी दिल्ली - राजधानीत प्रदूषणाची पातळी वाढली आहे. आता यातच पावसाने जोरदार हजेरी लावली. शनिवारी रात्री फटाके फोडल्यामुळे प्रदूषणात वाढ झाली होती. वायू गुणवत्ता निर्देशांक 450 वर पोहचला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही दिल्लीत आतषबाजी झाली. त्यामुळे अगोदरच खराब असलेल्या हवेवर वाईट परिणाम झाला.

कडाक्याच्या थंडीत दिल्लीत पाऊस

दिल्लीसह हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि इतर काही राज्यांतही पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यानं वर्तवली होती. अनेक भागांमध्ये फटाके फोडले गेल्याने प्रदूषणाचा धोका आणखी वाढला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दिल्लीतील प्रदूषणाने गाठली धोक्याची पातळी -

दरवर्षी हिवाळ्यात दिल्लीतील प्रदूषण धोक्याची पातळी गाठत असते. यावर्षी कोरोनाचा प्रसार आणि हवा प्रदूषण या दोन्हींचा सामना दिल्लीकरांना करावा लागणार आहे. तर विना-वॉल्व्हचे एन-९५ मास्क वापरण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्लीकरांना दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details