नवी दिल्ली - रेल्वे विभागाने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. विभागीय रेल्वे विभागाने तसा प्रस्ताव पाठवला होता. त्यास मान्यता देण्यात आली आहे. २० ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरच्या दरम्यान १९६ गाड्यांच्या जोड्या म्हणजेच एकूण ३९२ गाड्या सोडण्यात येणार आहेत.
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या विशेष गाड्या - festival special trains
भारतीय रेल्वेने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २० ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरच्या दरम्यान १९६ गाड्यांच्या जोड्या म्हणजेच एकूण ३९२ गाड्या सोडण्यात येणार आहेत.
रेल्वेच्या विशेष गाड्या
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विशेष गाड्यांप्रमाणेच या गाड्यांना भाडे आकारले जाईल, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे. ५५ किमी प्रतितास वेगाने ह्या गाड्या चालणार आहेत. या गाड्यांत वातानुकूलित डबे वाढविण्याची माहिती मिळाली आहे. ३९२ गाड्यांची यादी रेल्वेने जारी केली आहे.