नवी दिल्ली -महात्मा गांधीच्या १५० व्या जयंतीनिमित्त आज देशासह जगभरातील लोक गांधींना अभिवादन करत आहेत. विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ईटीव्ही भारततर्फे महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त विशेष गीत लाँच करण्यात आले आहे. हे गीत रेल्वे मंत्रालयाने आयोजीत केलेल्या कार्यक्रमामध्ये दाखवण्यात आले आहे.
गांधी@150 : रेल्वे मंत्रालयाने दाखवले ईटीव्ही भारतचे गीत -
महात्मा गांधीच्या १५० व्या जयंतीनिमित्त आज देशासह जगभरातील लोक गांधींना आभिवादन करत आहेत. विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रामोजी ग्रुप ऑफ कंपनीजचे चेअरमन रामोजी राव यांनी महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त 'वैष्णव जन तो तेने रे कहिये, जे पीड पराये जाने रे...' या भजनाच्या नवीन संगीतमय आवृत्तीचे लोकार्पण केले. या भजनाच्या माध्यमातून ईटीव्ही भारतने भारतीयांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. देशभरातील गायकांनी हे गीत गायिले आहे.
'ईटीवी भारत की ओर से देश के सर्वश्रेष्ठ गायकोंने बापू को दी संगीतमय श्रद्धांजलि' असे ट्विट करत गोयल यांनी या गीताची स्तुती केली आहे. तर, वेंकैया नायडू यांनी #India, #MahatmaGandhi या हॅशटॅग्जसह ट्विट केले आहे.