लखनौ - उत्तरप्रदेशातील लखनौ येथील रेल्वे इंजिनिअर्सनी टाकाऊ वस्तूंपासून लढाऊ विमान राफेलची प्रतिकृती बनवली आहे. विशेष बाब म्हणजे या प्रतिकृतीतून राफेलच्या इंजिनाचा आवाजही येत आहे. याआधीही रेल्वेच्या इंजिनिअर्सनी टाकाऊ वस्तूंपासून मेक इन इंडियाचा सिंह आणि इस्त्रोचे पीएसएलव्हीची प्रतिकृतीही बनवली आहे.
रेल्वे इंजिनिअर्सनी टाकाऊ वस्तूंपासून बनवली राफेलची प्रतिकृती - प्रतिकृती
राफेलसारखी प्रतिकृती बनवण्यासाठी इंटरनेटवरील छायाचित्रांचा आधार घेण्यात आला. याआधीही रेल्वेच्या इंजिनिअर्सनी टाकाऊ वस्तूंपासून मेक इन इंडियाचा सिंह आणि इस्त्रोचे पीएसएलव्हीची प्रतिकृतीही बनवली आहे.
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, की राफेलची प्रतिकृती बनवण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी लागला. यासाठी ८ इंजिनिअर्सनी मेहनत घेतली. प्रतिकृतीचा सर्वाधिक भाग हा शक्यतो टाकाऊ वस्तूंपासूनच बनविण्यात आला आहे. राफेलसारखी प्रतिकृती बनवण्यासाठी इंटरनेटवरील छायाचित्रांचा आधार घेण्यात आला. आम्ही छायाचित्रांचा अभ्यास केला आणि राफेलला मिळतीजुळती प्रतिकृती बववली. इंटरनेटवरुन राफेल विमानाच्या इंजिनाच्या आवाजाची रेकॉर्डिंग करण्यात आली. यामुळे, राफेलचे इंजिन चालू आहे, असा भास निर्माण करण्यात आम्हाला यश आले.
राफेल प्रतिकृती बनवण्यासाठी रेल्वेपासून मिळालेल्या टाकाऊ पत्र्यांचा वापर करण्यात आला. तर, सेवेतून बाद झालेल्या रेल्वेच्या कोचेसमधून वायरिंगची जुळवाजुळव करण्यात आली, अशी माहितीही रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.