महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लखनऊ : भारत दर्शन रेल्वेने घेता येणार अयोध्या दर्शन - आयोध्या बातमी

टाळेबंदीतून शिथीलता मिळाल्यानंतर अनेकांनी अयोध्येसाठी रेल्वे सुरू व्हावी, अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली. या मागणीनुसार रेल्वे प्रशासनाने भारत दर्शन रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

By

Published : Oct 27, 2020, 9:05 PM IST

लखनऊ (उत्तर प्रदेश) -देशभरातील भक्तांसाठी आस्थेचे केंद्र असलेल्या भव्य राम मंदिराचे निर्माण होत आहे. यामुळे अनेकांना अयोध्येला जायचे आहे. मात्र, टाळेबंदीच्या काळात सर्व धार्मिक स्थळे बंद असल्याने भक्तांना घरातच राहून प्रार्थना करावी लागत होते. आता टाळेबंदीतून शिथीलता मिळाल्यानंतर अनेकांनी अयोध्येसाठी रेल्वे सुरू व्हावी, अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. या मागणीनुसार रेल्वे प्रशासनानेही भारत दर्शन रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • राम पथ यात्रा

यंदाच्या मार्च महिन्यापासून कोरोनामुळे जी रामायण यात्रा सुरू झाली नाही ती आता पुढील महिन्यात सुरू होणार आहे. भारत दर्शन रेल्वे धावू न शकल्याने आता रेल्वेने या गाडीचे नाव बदलून श्री राम पथ यात्रा आणि राम जन्म भूमी स्पेशल टूरिस्ट ट्रेन, असे केले आहे. ही रेल्वे देशातील सर्व राज्याच्या राजधानीच्या शहरातून अयोध्येसाठी धावणार आहे.

  • 28 मार्चपासून सुरू होणार होती यात्रा

रामायण एक्स्प्रेस रेल्वेची सुरुवात 28 मार्चला होणार होती. रेल्वे बुकिंगही झाले होते. अयोध्या, सीतामढी, नेपाळ मधील जनकपूर, चित्रकूट, नाशिक, रामेश्वरममार्गे कोलंबोपर्यंत जाणार होती. पण, कोरोनामुळे रामायण यात्रा एक्स्प्रेस रद्द करण्यात आली.आता भारतीय रेल्वेने पुन्हा श्री रामायण यात्रा रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

  • एसी नाही केवळ शयनयान कक्ष

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता वातानुकूलित कक्ष (डबे) बंद करण्यात आले आहेत. यामुळे भारतीय रेल्वेत आता वातानुकूलित डबे नसणार. कोरोनामुळे यंदा रामायण यात्रा सीतामढी, जनकपूर आणि रामेश्वरमसह कोलंबोला जाणार नाही.

  • असा असेल दर्शन कार्यक्रम

अयोध्येहून चित्रकूटसाठी पहिली पर्यटन रेल्वे डेहराडूनहून 12 डिसेंबरला सुटणार आहे. ही रेल्वे 13 डिसेंबरला लखनऊमार्गे अयोध्या येथे पोहोचणार आहे.

हेही वाचा -बिहार विधानसभा निवडणूक : पहिल्या टप्प्यात युवा नेत्यांचे राजकीय भविष्य मतदारांच्या हातात

ABOUT THE AUTHOR

...view details