महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दाट धुक्यामुळे उत्तर भारतातील रेल्वे, विमान आणि रस्तेवाहतूक विस्कळीत - दिल्ली धुके

राजधानी दिल्ली आणि शेजारील राज्यामध्ये दाट धुक्याची चादर पसरली आहे. धुक्यामुळे रेल्वे सेवा, विमान सेवा आणि रस्ते वाहतूक प्रभावित झाली आहे.

रेल्वे सेवा विस्कळीत
रेल्वे सेवा विस्कळीत

By

Published : Jan 22, 2020, 12:41 PM IST

नवी दिल्ली - राजधानी दिल्ली आणि शेजारील राज्यामध्ये दाट धुक्याची चादर पसरली आहे. धुक्यामुळे रेल्वे सेवा, विमान सेवा आणि रस्ते वाहतूक प्रभावित झाली आहे. दृष्यमानता कमी असल्यामुळे २३ रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत, तर दिल्ली विमानतळावर येणाऱ्या ५ विमानांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. शहरातील अनेक भागात फक्त ५० मीटर पर्यंतचे स्पष्ट दिसत आहे.

मुंबई अमृतसर एक्सप्रेस पाऊने तीन तास उशिराने धावत आहे. याबरोबर इतर २२ रेल्वे उशिराने धावत आहेत. उत्तर भारत धुक्यामध्ये हरवला आहे. रेल्वे सेवा, विमान सेवा आणि रस्ते वाहतूक धुक्यामुळे प्रभावित झाल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील अनेक भागात धुके पसरले आहे. उत्तर रेल्वेचे प्रमुख जनसंपर्क अधिकारी दीपक कुमार म्हणाले की, सुरक्षित रेल्वे प्रवास ही रेल्वे विभागाची प्राथमिकता आहे. प्रवाशांच्या सोईसाठी दिरंगाईने धावणाऱ्या गाड्यांची माहिती देण्यात येत आहे. तसेच घरुन निघण्यापूर्वी आधी गाडीची स्थिती जाणून घेण्याचे आवाहन रेल्वे विभागाने केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details