नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हाथरस पीडित कुटुंबीयांशी संवाद साधत असतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. शनिवारी (३ ऑक्टोबर) राहुल गांधींनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली होती. आधी योगी सरकारने राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना भेट घेण्यापासून रोखले होते. मात्र, नंतर त्यांना परवानगी देण्यात आली होती.
शनिवारी राहुल आणि प्रियंका गांधींनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते. तसेच न्याय मिळेपर्यंत पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन कुटुंबीयांना दिले होते. यावेळी राहुल गांधींनी जो संवाद साधला त्याचा व्हिडिओ त्यांनी ट्विटरवरून शेअर केला आहे. या व्हिडिओत राहुल गांधी पीडित कुटुंबीयांसोबत घरात बसलेले दिसत आहेत. "तुम्ही कोणत्याही भीतमध्ये राहू नका. तसेच गाव सोडून जाऊ नका. तुम्ही सर्वजण सुरक्षित रहावेत, यासाठी मी गावात तुम्हाला भेटण्यास आलो आहे", असे राहुल व्हिडिओत म्हणाले आहेत.
नक्की कोणाचा मृतदेहावर अंत्यसस्कार केले?
हाथरस जिल्हा प्रशासननाने कुटुंबीयांच्या परवानगी शिवाय परस्पर पीडितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याचा आरोप आहे. मुलीचा शेवटचा चेहराही पाहू दिला नाही, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला योग्य वागणूक दिली नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. 'आम्हाला कसे कळेल की, त्यांनी कोणाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले', असे कुटुंबीय म्हणताना दिसत आहेत.
हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्येचे संपूर्ण देशात पडसाद उमटत आहेत. उत्तर प्रदेशात सरकारने ज्या प्रकारे हे प्रकरण हाताळले त्यावरून विरोधी पक्षांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल केला. सुरुवातीला माध्यमे आणि राजकीय नेत्यांना पीडित कुटुंबीयांशी भेटू दिले जात नव्हते. मात्र, नंतर परवानगी देण्यात आली त्यावरू राज्य सरकारच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. तर हाथरस प्रकरणावरून उत्तर प्रदेश सरकारला बदनाम करण्यासाठी आंतरराष्ट्रीय
गावातील चार सवर्ण तरुणांनी हाथरसमधील दलित तरुणीवर शेतामध्ये बलात्कार केला तसेच तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. आरोपींनी तिची जीभही कापली. तिच्या मानेला आणि पाठीच्या कण्याला गंभीर इजा झाली होती. गंभीर अवस्थेत तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू झाला. त्यानंतर संपूर्ण देशभरात आंदोलन पेटले आहे.