महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

हाथरस सामूहिक बलात्कार : राहुल-प्रियांका घेणार पीडित कुटुंबीयांची भेट, हाथरसरकडे रवाना

आज काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी पीडित तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेणार असून ते हाथरसकडे रवाना झाले आहेत. तसेच काँग्रेसने मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

राहुल-प्रियांका
राहुल-प्रियांका

By

Published : Oct 1, 2020, 12:36 PM IST

Updated : Oct 1, 2020, 2:44 PM IST

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणावर देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आज काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी पीडित तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेणार असून ते हाथरसकडे रवाना झाले आहेत. तसेच काँग्रेसने मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तथापि, या प्रकरणाच्या तपासणीसाठी उत्तर प्रदेश सरकारकडून गठीत करण्यात आलेली विशेष तपासणी पथक (SIT) हाथरसमध्ये दाखल झाले आहे.

राहुल-प्रियांका घेणार पीडित कुटुंबीयांची भेट

'हाथरससारखी बिभत्स घटनेनंतर बलरामपूरमध्येही बलात्काराची घटना घडली. बलात्कारानंतर मुलीचे पाय आणि कंबर तोडण्यात आले. आझमगढ, बागपत, बुलंदशहरात मुलींसोबत या घटना घडल्या आहेत. उत्तर प्रदेशात पसरलेल्या जंगलराजची आता हद्दच संपलीय. मार्केटिंग आणि भाषणांनी कायदाव्यवस्था चालत नाही. मुख्यमंत्र्यांनी जनतेला उत्तर द्यावं', असे ट्विट प्रियांका गांधी यांनी केले.

भारतातील एका मुलीवर बलात्कार केला जातो, वस्तुस्थिती दडपली जाते आणि शेवटी अंत्यसंस्कार करण्याचा अधिकारही तिच्या कुटुंबाकडून काढून घेण्यात येतो. हे निंदनीय आणि अन्यायकारक आहे, असे राहुल गांधी बुधवारी म्हणाले होते.

19 वर्षीय दलित तरुणी शेतात गेली असता चार तरुणांनी तिच्यावर अत्याचार केले होता. तसेच तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्नही केला होता. मंगळवारी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन केले आहे. आम्हाला मुलीचा शेवटी चेहराही पाहता आला नाही. पोलिसांनी बळजबरीने अंत्यसस्कार केले, असा आरोप बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे.त्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर योगी आदित्यनाथ सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे.

Last Updated : Oct 1, 2020, 2:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details