नवी दिल्ली - कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षनेत्या प्रियांका गांधी वड्रा यांनी उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारवर सोमवारी जोरदार टीका केली. उत्तर प्रदेशात दलित आणि महिला अत्याचारात सातत्याने वाढ होत आहेे. त्यामुळे उत्तर प्रदेशात जंगलराज असल्याचा हल्लाबोल कॉंग्रेस नेत्यांनी केला.
'उत्तर प्रदेशात जंगलराज': दलित, महिलांवरील अत्याचारामुळे राहुल, प्रियंका गांधी संतप्त - राहुल गांधी योगी सरकारवर संतापले
उत्तर प्रदेशात दलित आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारामुळे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी चांगलेच संतप्त झाले. उत्तर प्रदेशात जंगलराज असल्याची टीका त्यांनी केली.
संग्रहित छायाचित्र
आझमगड जिल्ह्यातील बासगाव येथील दलित सरपंचावर हल्ला करण्यात आला. तसेच सत्यमेव या आणखी एका दलित सरपंचाची हत्या करण्यात आली. त्यामुळे राहुल गांधी यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली.
प्रियंका गांधी-वाड्रा यांनी देखील सोशल माध्यमातून योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर जोरदार टीका केली. अगोदर बुलंदशहर, हापूर, लखीमपूर खिरी, आणि आता गोरखपूरमध्ये महिलांवर अत्याचार करण्यात आले. सरकार महिलांवरील अत्याचार रोखण्यात सपशेल अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली आहे.