नवी दिल्ली - कोलंबिया विद्यापीठाने सोमवारी यावर्षीच्या पुलित्झर पारितोषिकांची घोषणा केली आहे. मध्ये पत्रकारितेचे १५, आणि साहित्य, नाटक आणि संगीत यामधील सात पुरस्कारांचा समावेश आहे. यावर्षी हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींंमध्ये तीन भारतीय छायाचित्रकारांचा समावेश आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय छायाचित्रकांराचे अभिनंदन केले आहे. दरम्यान यावरून भाजपने राहुल गांधींवर टीका केली आहे.
तीन छायाचित्रकारांना पुलित्झर पुरस्कार मिळाला आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग नाही. भारताने काश्मीर जबरदस्तीने काबीज केले आहे, असे हा पुरस्कार म्हणतो. राहुल यांनी तीन तथाकथित पत्रकारांचे अभिनंदन केले आहे. त्यामुळे काश्मीरबद्दल काँग्रेसचे मत काय आहे, हे सोनिया गांधींनी स्पष्ट करावे, असे टि्वट भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी केले आहे.