महाराष्ट्र

maharashtra

राहुल गांधी 'पप्पू' नाहीत; ते हुशार आणि उच्च शिक्षित - सॅम पित्रोदा

By

Published : May 5, 2019, 5:51 PM IST

राहुल गांधी यांना समाज माध्यमांवर पप्पू म्हणून ओळखले जाते. यावरून त्यांची मोठ्या प्रमाणात मजाकही उडवली जाते. त्यांना अद्यापही राजकारणाचा 'र' समजत नाही, असे अनेक दावे केले जातात.

सॅम पित्रोदा

भोपाळ -काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी 'पप्पू' नाहीत. ते हुशार आणि उच्च शिक्षित आहेत, असा दावा ओव्हरसीस काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी केला आहे. मध्य प्रदेशात एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. देशाला हुशार आणि तरुण पतंप्रधानाची गरज आहे आणि राहुल गांधी त्यासाठी परिपूर्ण आहेत, असेही पित्रोदा यावेळी म्हणाले.

राहुल गांधी यांना समाज माध्यमांवर पप्पू म्हणून ओळखले जाते. यावरून त्यांची मोठ्या प्रमाणात मजाकही उडवली जाते. त्यांना अद्यापही राजकारणाचा 'र' समजत नाही, असे अनेक दावे केले जातात. त्यावर उत्तर देण्यासाठी काँग्रेसला विशेष पत्रकार परिषदच घ्यावी लागली.


राहुल गांधी अत्यंत चाणाक्ष बुद्धीचे व्यक्ती आहेत. त्यांच्या सहवासात आपण मोठा काळ घालवला आहे. त्यांनी अनेकदा देशाच्या भविष्याबाबात माझ्याशी संवाद साधला आहे. त्यामधून त्यांची देशासाठी असलेली तळमळ आणि देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी त्यांच्या योजनांनी मला अनेकदा आकर्षित केले आहे, असे सॅम पित्रोदा यांनी पत्रकारांना सांगितले.

भारताला तरुण नेतृत्वाची गरज आहे. देशाला असा व्यक्ती हवा आहे, जो तंत्रज्ञानावर काम करतो पण जुमलेबाजी करत नाही. आपल्याला अशा नेतृत्वाची गरज आहे, ज्यांचा लोकशाहीवर विश्वास आणि जो लांकाबद्दल बोलतो. मला आशा आहे, राहुल गांधी देशामध्ये नक्कीच बदल घडवून आणतील. कारण मागील १० वर्षांत भाजपने त्यांच्या विरोधात जे पेरले आहे, राहुल गांधी त्या पेक्षा अत्यंत भिन्न आहेत, असेही पित्रोदा म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details