नवी दिल्ली -जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या मोर्चादरम्यान गुरुवारी गोळीबार झाल्याची घटना घडली. त्या गोळीबार करणाऱ्या तरुणाला पैसै कोणी दिले, असा सवाल शुक्रवारी राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा सवाल केला.
दिल्लीच्या राजघाट ते जामिया विद्यापीठापर्यंत मोर्चा काढण्याची परवानगी जामियाच्या विद्यार्थ्यांनी (बुधवार) मागितली होती. दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही आज विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला होता. सीएए आणि एनआरसी विरोधात दिल्लीच्या राजघाटपासून विद्यापीठापर्यंत विद्यार्थ्यांचा मोर्चा सुरू होता. यावेळी एका तरुणाने गोळीबार केला.
मोर्चा दरम्यान तरुणाने समोर येत, विद्यार्थ्यांच्या दिशेने हातातील पिस्तूल दाखवले. पिस्तुल दाखवत त्यांने जय श्रीराम' आणि 'वंदे मातरम' घोषणा दिल्याची माहिती आहे. यावेळी त्याने काही गोळ्याही झाडल्या, ज्यात एक शाबाद फारूक नावाचा विद्यार्थी जखमी झाला. गोळीबार करणारा तरुण स्वतःला रामभक्त म्हणतो. तो बारावीचा विद्यार्थी असून त्याच्या या कृत्याने कुटुंबातील लोकांना मोठा धक्का बसला आहे.
जामिया हिंसा : गोळीबार करणाऱ्या 'त्या' तरुणाला पैसे कोणी पुरवले?
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या मोर्चादरम्यान गुरुवारी गोळीबार झाल्याची घटना घडली.
राहुल गांधी